बीएसएफच्या जवानांना बांगलादेशी नागरिकांकडून मारहाण , केंद्राकडून चुप्पी

शेअर करा

एक अत्यंत संतापजनक अशी घटना समोर आलेली असून भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर 100 पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांनी हल्ला केलेला असून दोन जवान यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत. भारतीय शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी हे जवान आपल्या कर्तव्यावर असताना बांगलादेशच्या नागरिकांनी सीमेपलीकडून दाखल होत त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची शस्त्रे लुटून पलायन केले.

बीएसएफने यासंदर्भात एक निवेदन दिलेले असून त्यामध्ये बंगाल फ्रंटइयरच्या बेरहमपूर सेक्टर परिसरात ही घटना घडलेली असून काही बांगलादेशी शेतकरी त्यांची गुरे चारण्यासाठी जाणीवपूर्वक भारताच्या हद्दीत घुसवतात आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करतात. भारतीय शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बीएसएफ जवानांनी तात्पुरती चौकी उभारलेली आहे इथे हे जवान कार्यरत होते.

जवानांनी बांगलादेशी शेतकऱ्यांना रोखल्यानंतर गावकरी आणि काही बदमाश व्यक्तींनी भारतीय हद्दीत घुसून चक्क जवानांवर लाठ्या आणि धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यानंतर त्यांची शस्त्रे हिसकावून पलायन केले. केंद्र सरकारकडून सदर घटनेचा अद्यापपर्यंत साधा निषेधही करण्यात आलेला नाही तसेच बांगलादेशवर कारवाईचे कुठलेही पाऊल देखील उचलण्यात आलेले नसल्याने 56 इंच छाती काय उपयोगाची ? असा संतप्त सवाल सीमेवरील शेतकरी करत आहेत


शेअर करा