पुण्यातील जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली महिला सापडली ‘ ह्या ‘ ठिकाणी ..

  • by

पुणे येथील जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली 33 वर्षीय महिला अखेर शनिवारी पिरंगुटच्या घाटात सापडली असून सदर महिला तिथपर्यंत कशी पोहचली याची नेमकी माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही . संबंधित महिला सुरक्षित असून सध्या कुटुंबीयांसमवेत आहे. प्रिया गायकवाड असं या महिलेचं नाव असून त्या सुखरूप असल्याचे कळते आहे.

प्रिया गायकवाड यांना 5 तारखेलाच जम्बो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता पण त्यांच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने त्या रस्ता चुकल्या आणि पिरंगुटकडे चालत गेल्या आणि तिकडेच बेवारस अवस्थेत राहत होत्या असे सांगितले जात आहे. मात्र आईने उपोषणच सुरु केल्याने नाहक जम्बो हॉस्पिटलची ह्या प्रकरणात बदनामी झाल्याचे बोलले जात आहे .

जम्बो हॉस्पिटलकडून व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यानेच आमचा रुग्ण बेपत्ता झाला होता, असा आरोप नातेवाईकांकडून आताही होत आहे. जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड यांच्याबाबत घातपाताचा संशय नातेवाईकांनी वर्तवला होता तर माझी मुलगी कुठे आहे? असा सवाल करत आईने आपल्या बेपत्ता लेकीसाठी जम्बो कोविड सेंटर समोरच बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलं होतं.