स्टीव्हची फ्रेंड रिक्वेस्ट पाहून उच्चभ्रू ‘ बया ‘ पाघळली..पतीला समजले मात्र तोवर….: कुठे घडली घटना ?

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून त्यानंतर त्याच्या आधारे ब्लॅकमेल करणे तसेच फसवणुकीचे अनेक गुन्हे घडत आहेत .नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार विदेशी फेसबुक फ्रेंडने गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली एका महिलेला तब्बल बारा लाख पंचेचाळीस हजारांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नागपूर येथे घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिलेचा पती हा व्यावसायिक आहे. सुरुवातीला पतीला ह्या प्रकाराची कल्पनाच नव्हती मात्र आर्थिक फसवणूक झाल्यानंतर याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली. सदर व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार 4 जून 2020 रोजी त्यांच्या पत्नीला स्टीव्ह मायक्रोन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. व्यावसायिकाच्या पत्नीने ती एक्सेप्ट केली. त्यानंतर आरोपी तिच्याशी सातत्याने चॅटींग करु लागला . महिलेने देखील हा प्रकार आपल्या पतीला सांगितला नाही .

काही दिवसानंतर त्या आरोपीने महिलेचा मोबाईल नंबर मागितला. तो मिळाल्यानंतर आरोपी आणि महिला संपर्कात राहू लागले. अलीकडे आरोपीने महिलेला तिच्यासाठी महागडे विदेशी गिफ्ट पाठवण्याची थाप मारली. महिलेने नको-नको म्हणत असताना तरी त्याने तिला गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर साधना रॉय नावाच्या महिलेचा पीडित महिलेला फोन आला. तुमच्यासाठी महागडे गिफ्ट आले असून त्याची कस्टम ड्युटी तुम्हाला भरावी लागेल असे साधना नामक महिलेने तिला सांगितले. कस्टम ड्युटी भरली नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशी धमकी देखील दिली.

काही दिवसांनी साधनाची साथीदार संचिता हिचा देखील नंतर फोन आला आणि या दोघींनी पीडित महिलेला घाबरवल्यानंतर त्यांचा एक साथीदार बलविंदर खारीर याने आपले अकाऊंट नंबर देऊन वेगवेगळी कारणे सांगून पीडित महिलेला त्या खात्यात बारा लाख पंचेचाळीस रुपये भरण्यास भाग पाडले मात्र तरीदेखील त्यांचा पैशाचा हव्यास कमी होत नसल्याने पीडित पत्नीने आपल्या पतीला ही बाब सांगितली. व्यावसायिकाने आपल्या नातेवाईकांशी ह्या विषयावर चर्चा केल्यानंतर गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदणी. सहाय्यक पोलीस निरीक्षक वडस्कर यांनी फसवणुकीच्या आरोपाखाली आरोपी स्टीव्ह मायक्रोन,साधना, संचिता व बलविंदर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

स्टीव्ह मायक्रोन,साधना, संचिता व बलविंदर यांची नावे देखील खरी आहे का ? इथपासून पोलिसांना शोध घ्यायचा असून पीडित महिलेने ज्या ज्या अकाउंट ला पैसे पाठवले तसेच पीडित महिला व आरोपीचे मोबाईल नंबर याच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे मात्र वेळीच जर व्यावसायिकाच्या पत्नीने असा मोह आवरला असता आणि आपली पतीला या प्रकाराची कल्पना दिली असती तर फसवणूक टाळता आली असती .


शेअर करा