राष्ट्रीयीकृत बँका अन एलआयसीवर काँग्रेसकडून हल्लाबोल , 6 मार्चपासून..

शेअर करा

एकीकडे अडाणी उद्योग समूहाने केलेल्या कथित घोटाळ्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा डागाळली गेलेली असताना दुसरीकडे केंद्र सरकारकडून मात्र याविषयी एक शब्द देखील उच्चारण्यात आलेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत अडाणी यांचे नाव देखील घेतलेले नाही त्यामुळे केंद्र सरकार अडाणी आणि गोदी मीडिया यांच्यातील नेक्सस समोर आलेला आहे . काँग्रेसने मात्र अडाणी मुद्द्यावर केंद्राला प्रश्न विचारण्यास सुरू केलेले असून पुढील दोन महिने गौतम अडाणी आणि एलआयसीच्या मुद्द्यावर देशव्यापी आंदोलन काँग्रेसकडून करण्यात येणार आहे.

6 मार्चपासून तर दहा मार्चपर्यंत काँग्रेस राष्ट्रीयकृत बँक आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार असून 13 मार्च रोजी प्रत्येक राज्याच्या राजधानीत चलो राजभवन मार्च काढण्यात येणार आहे आणि मार्च अखेरपर्यंत जिल्हास्तरीय पर्दाफाश आंदोलन सुरू करण्याची देखील काँग्रेसने तयारी केलेली आहे.

रायपुर अधिवेशनात पक्षाने मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली होती त्यानंतर राहुल गांधी यांनी देखील मल्लिकार्जुन खरगे यांना निवेदन देताना आपण आम्हाला दिशानिर्देश द्या. माझ्यासह काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनात उतरणार आहे असे सांगत अडाणी समूहाला वाचवण्यासाठी एसबीआय आणि एलआयसीला गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले त्यामुळे कोट्यावधी लोकांची बचत धोक्यात आलेली आहे. तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे आणि बचत तुमच्या मुलाच्या आणि कुटुंबीयांच्या भविष्यासाठी ठेवलेली होती तुमचा पैसा कोण धोक्यात घालत आहे ? असा खडा सवाल राहुल गांधींनी विचारला होता.


शेअर करा