त्यांच्यासोबत तुम्ही गोंडा घोळत आहात , उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं

शेअर करा

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्हीही शिंदे गटाला मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना भाजपच्या राष्ट्रवादावर जोरदार टीका केलेली असून ज्या पद्धतीने भाजप सत्तेसाठी आसुसलेला पाहायला मिळत आहे त्यावर देखील संताप व्यक्त केलेला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या घराणेशाहीवर तुम्ही टीका करता तुमचा आगापिछा काय आहे ते एकदा पहा. तुमची मूलबाळ कोणत्याही कमिटीचे अध्यक्ष करायची आणि कुणीच काही बोलायचे नाही. आत्ताच निवडणूक झाली कसबामध्ये तुमचा सुपडासाफ झाला. बंडखोरी नसती तर चिंचवडला देखील तुमचा सुपडासाफ झाला असता आणि अंधेरीत लढायची तर तुमची हिंमतही नव्हती.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ मेघालयमध्ये निवडणूक झाली तिथे अमित शहा गेले होते. तिथले मुख्यमंत्री संगमा यांच्यावर अमित शहा यांनी भयानक आरोप केले होते. दोन कुटुंबांनीच गरिबांचा पैसा खाल्ला. मेघालय देशातील भ्रष्ट राज्य आहे तरीदेखील पुन्हा तिथे संगमा यांनी सत्ता मिळवली त्यानंतर मोदी ट्विट करून म्हणतात की आपण दोघे मिळून सरकार स्थापन करू. ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच सोबत तुम्ही गोंडा घोळत आहात असे देखील ते म्हणाले.

अमित शहा यांनी पुण्यात येऊन उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे तळवे चाटले असे म्हणाले होते यावर देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलेला असून तुमच्याबरोबर आला की चांगला आणि बाजूला गेला की भ्रष्ट असे तुमचे धोरण असून भाजप संपूर्ण देश नासवण्याचे काम करत आहे, असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे.


शेअर करा