‘ मी तुझी नजर ओळखली , ‘ अखेर ‘ त्या ‘ पत्रकारावरच गुन्हा दाखल

शेअर करा

लोकशाही जिवंत राहण्यासाठी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे गरजेचे असते. भाजप सत्तेत आल्यानंतर सातत्याने पत्रकारांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न होत असून पंतप्रधान मोदी यांनी देखील अद्यापपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. जर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला भीती वाटत असेल तर 56 इंची छाती काय कामाची ? अशी देखील टीका आता पंतप्रधान मोदींवर टीका होत असून त्यांच्याच पद्धतीने भाजपचे इतर नेते देखील वागत असल्याचे चित्र देशात आहे.

उत्तर प्रदेश येथे संबळ परिसरात एका यूट्यूब चैनलच्या पत्रकाराने शिक्षण मंत्री असलेल्या गुलाब देवी यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारला होता मात्र त्यानंतर शिक्षण मंत्री संतापल्या आणि त्यांनी चक्क पत्रकारांनाच उद्धट स्वरूपाची उत्तरे देण्यास सुरू केले. मंत्र्याच्या कार्यक्रमात झालेल्या गदारोळानंतर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस यांनी यासंदर्भात पत्रकाराच्या विरोधातच तक्रार दिली असून त्याच्यावर मारहाण आणि शिवीगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी पत्रकारालाच अटक केलेली असून उत्तर प्रदेश सरकारच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.

चंदौसी येथे बुद्धनगर खंडवा भागात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते त्यावेळी चंदोशी मतदारसंघाच्या आमदार गुलाब देवी या तिथे पोहोचलेल्या होत्या. कार्यक्रमाच्या दरम्यान या पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारले तेव्हा पत्रकाराच्या बाजूला उभे असलेल्या एका महिलेने त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला मात्र पत्रकार गप्प होत नसल्याकारणाने स्वतः शिक्षण मंत्री गुलाबदेवी यांनी हस्तक्षेप केला. गुलाब देवी बोलताना स्वतःची मर्यादा विसरल्या आणि त्यांनी पत्रकारांना अरेतुरे करण्यास सुरू केले.

गुलाब देवी म्हणाल्या की, ‘ मी बराच वेळापासून तुझी नजर ओळखली होती. तू तिथे उभा असताना मी तुझी नजर ओळखली. तुझ्या जागी सर्व गोष्टी बरोबर आहेत पण अजून ती वेळ आलेली नाही . कुंदनपुर गाव आणि बुद्धनगर खंडवा हे माझेच आहेत हे तू विसरलास. मी सांगितलेल्या या गोष्टी सर्व होतील ‘, असे देखील त्यापुढे म्हणाल्या. त्यांच्या या गदारोळाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला असून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यास भाजपचे नेते कुठल्याही पद्धतीने बांधीलकी दाखवत नसल्याने अशा नेत्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.


शेअर करा