सावरकर समझा क्या.. नाम राहुल गांधी है

शेअर करा

राहुल गांधी यांनी न केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपच्या नेत्यांकडून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. राहुल गांधी यांनी परदेशात बोलताना ‘ भारतातील प्रॉब्लेम हे भारतातील आहेत आणि त्यासाठी मार्गदेखील भारतातून निघेल ‘ असे म्हटलेले होते मात्र अंबानी अडाणीवरून त्यांनी टीका केल्यानंतर भाजपचा थयथयाट सुरु झालेला असून राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी भाजपच्या विविध नेत्यांनी सुरू केलेली आहे.

काँग्रेसपक्षाने देखील देखील ट्विटरवर प्रत्युत्तर देताना, ” सावरकर समझा क्या… नाम राहुल गांधी है ‘, असे ठणकावलेले असून त्यांचा चार चाकी गाडीतील फोटो वरील मेसेजसह काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेला आहे. राहुल गांधी यांनी परदेशात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना देशातील अडचणी या देशातील आहेत आणि त्यासाठी मार्ग देखील भारतातूनच निघेल असे म्हटलेले होते .

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अडाणी यांच्यातील संबंधावर टीका केली होती सोबतच संसदेत देखील त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत अडाणी यांचा विमानात बसल्याचा फोटो दाखवला होता त्यावरून भाजपमध्ये सध्या चांगलीच खळबळ उडाली असून पंतप्रधान मोदी यांनी अद्यापपर्यंत आपल्या अनेक तासंतास केलेल्या एकतर्फी भाषणात ( पत्रकार परिषदेत नव्हे ) कधीही चीन आणि अडाणी यांचे नाव घेतलेले नाही त्यामुळे या पार्श्वभूमीवर भाजपच्या माफीच्या मागणीला काँग्रेसने सडेतोड उत्तर दिलेले आहे .


शेअर करा