बिनकामाची ‘ प्री इन्स्टॉल ‘ ॲप बंद होणार ? केंद्र निर्णय घेण्याच्या भूमिकेत

शेअर करा

अनेक मोबाईल कंपन्या आणि टेक कंपन्या यांच्या संयुक्त सहकार्याने मोबाईलमध्ये अनेक फ्री इन्स्टॉल ॲप येतात आणि त्यानंतर गरज नसलेली ही ॲप निष्कारण मोबाईलमधील जागा तसेच महत्त्वाची माहिती देखील मिळवतात. वापरकर्त्या व्यक्तीला अनेकदा याचा त्रास देखील होतो मात्र आता ही ॲप हटवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार असून त्यासाठी नियमात बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

नवीन नियम लागू झाल्यानंतर स्मार्टफोनमध्ये आधीच इन्स्टॉल असलेले ॲप काढून टाकण्याचा पर्याय देणे बंधनकारक राहणारा असून त्यामुळे सॅमसंग, शाओमी विवो, एप्पल यासारख्या मोठ्या कंपन्यांवर परिणाम होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही अनेक प्रिन्स्टॉल ॲप यांचा हेरगिरीसाठी वापर केला जाण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने यावर काम करण्याचे ठरवलेले दिसून येत आहे.


शेअर करा