अखेर ‘ तो ‘ सिरीयल किसर झाला गजाआड , रात्री करायचे हे काम ..

शेअर करा

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. बिहारच्या जमूई येथील सदर हॉस्पिटल परिसरात एका महिला कर्मचाऱ्यांचे चुंबन घेऊन एक आरोपी फरार झालेला होता. सदर घटनेमुळे बिहार येथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याचे देखील चित्र निर्माण झालेले होते. पोलिसांनी अखेर या टोळक्याला शोधण्याचे आव्हान स्वीकारले आणि त्याच्यासोबत त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे.

बिहारच्या जमूई येथील हा सिरीयल किसर चांगलाच चर्चेत आलेला होता. अनोळखी महिला आणि मुली रस्त्यावरून जात असताना किंवा उभ्या असताना हा पाठीमागून जायचा आणि अचानकपणे त्यांचा चेहरा पकडून चुंबन घेऊन पलायन करायचा. काही व्हिडिओ समोर आल्यानंतर या व्यक्तीला तातडीने अटक करण्याची मागणी विविध महिला संघटनांनी देखील केली होती तर पोलिसात देखील या प्रकरणी अनेक तक्रारी दाखल झालेल्या होत्या मात्र पोलिसांनी अखेर त्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत.

पोलिसांनी टोळीतील म्होरक्याला अटक केलेली असून मोहम्मद अक्रम असे त्याचे नाव असल्याचे समजते. तो महीसौदी मोहल्ला येथील रहिवासी असून या टोळीमध्ये इतरही चार जण कार्यरत आहेत. दिवसा महिलांची छेड काढायची त्यांना पकडून चुंबन घ्यायचे आणि रात्रीच्या वेळी चोऱ्या करायचा असा या टोळीचा उद्योग होता असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडलेल्या असून अनेक महिलांनी भीतीपोटी कुठे तक्रार केली नाही त्यातूनच या टोळीचे फावले जात होते.


शेअर करा