मोदीजी आमच्या रक्ताची एक खासियत की तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभी अन..

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ट्विटरवर संताप व्यक्त केलेला असून त्यामध्ये, ‘ तुमच्या चमच्यांनी एका शहीद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही मीर जाफर म्हटलं. आपल्याच एका मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींचे वडील कोण ? असा प्रश्न उपस्थित केला. काश्मिरी पंडितांच्या परंपरेचे पालन करत एक मुलगा मृत्यूनंतर पगडी घालत आपली परंपरा कायम ठेवतो पण तुम्ही भर संसदेत संपूर्ण कुटुंब तसेच काश्मिरी पंडित समाजाचा अपमान करत विचारलं की ते नेहरू नाव का लिहीत नाही पण तुमच्या कुठल्याही न्यायाधीशाने दोन वर्षाची शिक्षा त्यांना सुनावली नाही तसेच तुम्हाला संसदेतून बाद देखील केलेले नाही ‘.

राहुल गांधींनी एका खऱ्या देशभक्ताप्रमाणे प्रमाणे अडाणीच्या लुटीवरून प्रश्न उपस्थित केलेला होता. निरव मोदी आणि मेहुल चोक्सीवर प्रश्न विचारले. तुमचा मित्र गौतम अडाणी देशाची संसद आणि भारताच्या जनतेपेक्षा मोठा झाला आहे का ? त्यांच्या लुटीवर प्रश्न विचारले तर तुम्ही चवताळून उठलात

तुम्ही माझ्या कुटुंबाला घराणेशाही म्हणतात तर तुम्ही एक लक्षात ठेवा याच कुटुंबाने भारताच्या लोकशाहीला आपलं रक्त आटवून जिवंत ठेवलेले आहे जी लोकशाही तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करत आहात. याच कुटुंबाने भारताचा आवाज लढवला आहे तसेच आमच्या पूर्वजांनी देखील सत्याची लढाई लढलेली आहे. आमच्या दमन्यांमध्ये जे रक्त खेळतय त्याची एक खासियत आहे की तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभी आणि हुकूमशहासमोर कधीच झुकलो नाही आणि झुकणार देखील नाही . तुम्ही काहीही करा ‘, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संताप व्यक्त केलेला आहे.


शेअर करा