काँग्रेसला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन वाढले , राहुल गांधी नक्की काय म्हणाले होते ?

शेअर करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावलेली असली आणि त्यानंतर अपीलाची मुदत संपण्याआधीच त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले याप्रकरणी गौतम अडाणी मुद्द्यावर जेपीसीची मागणी राहुल गांधी सोडणार नसल्याचे सूत्रांकडून समजते. गौतम अडाणी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंध जेपीसीच्या माध्यमातून समोर येतील आणि गौतम अडाणी यांना आपल्या पदाचा किती दुरुपयोग करून पंतप्रधान मोदी यांनी मदत केली हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून या मागणीला जोरदार विरोध केला जात आहे.

संसदेतील कामकाज सुरळीत व्हावे म्हणून राहुल गांधी यांना आधी बोलण्याची बंदी करण्यात आली. राहुल गांधी बोलायला उभे राहतात त्यावेळी माइक बंद करण्यात आले सोबतच आता चक्क त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळताना दिसून येत आहे तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांमध्ये काँग्रेसने जीपीसीची मागणी सोडावी त्यानंतर लंडन येथील विधानाबाबत माफीची मागणी आम्ही देखील सोडून देऊ असे म्हटलेले आहे मात्र राहुल गांधी यांनी लंडन येथे केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ कुठल्याही भाजप नेत्यांनी आतापर्यंत शेअर केलेला नाही केवळ दिशाभूल करून न बोललेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागण्यापेक्षा लोकसभा सदस्यत्व गेले तरी बेहत्तर पण जेपीसीमार्फत चौकशी झालीच पाहिजे. जीपीसीचे गठन करून गौतम अडाणी यांची चौकशी झालीच पाहिजे अशी काँग्रेसची ठाम भूमिका आहे .

सोशल मीडियावर राहुल गांधी यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसत असून भाजपने भारत जोडो यात्रेला केलेला अटकाव , लोकसभेत बंद केलेले माइक , कुठल्याही चर्चेविना पास करण्यात आलेली बिले आणि अत्यंत किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सोबतच लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया या सर्व बाबी नागरिकांच्या लक्षात येत असून त्यातून राहुल गांधी यांना बोलण्यासाठी किती प्रमाणात अटकाव केला जात आहे हे देखील आता नागरिकांच्या लक्षात येत आहे .


शेअर करा