‘ चुलीवरील बाबा ‘ ची माहिती समोर , अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलं की..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या महाराष्ट्रातील एका बाबाची जोरदार चर्चा सुरू असून चक्क चुलीवर असलेल्या गरम तव्यावर बसून शिव्यांची लाखोली वाहत हा बाबा भक्तांवर संताप व्यक्त करत होता. बाबाच्या या शिव्यांना भक्त आशीर्वाद म्हणून देखील घेत होते अन धक्कादायक म्हणजे हा बाबा गरम तव्यावर बसलेला होता आणि त्याखाली लाकडी पेटवली जात होती.

आपल्या खास शैलीत बिडी फुकत भक्ताला शिव्यांची लाखोली वाहिलेल्या या बाबाची ओळख पटत नव्हती मात्र अखेर हा बाबा अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी कारला येथील असल्याची माहिती समोर आलेली आहे. बाबाने तिथे स्वतःचा आश्रम थाटलेला असून त्याचे नाव सच्चिदानंद गुरुदास बाबा असे आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे.

‘ चुलीवरील मटण चुलीवरील चिकन यानंतर आता चुलीवरील बाबा ‘ असा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर झालेला होता त्यामध्ये हा बाबा चक्क गरम तव्यावर बसून भक्तांना शिव्यांची लाखोली वाहत होता. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील सक्रिय झालेल्या असून बागेश्वर बाबानंतर या बाबाला देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिलेले आहे .

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलेले आहे की, ‘ 108°c पेक्षा जास्त उष्णता माणूस सहन करू शकत नाही त्यामुळे याबाबत आम्ही पेटवलेल्या चुलीच्या तव्यावर त्यांनी बसून दाखवावे. त्यांना कुठलीही इजा झाली नाही तर त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून तीस लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल आणि समितीचे कामकाज बंद करण्यात येईल , असे देखील म्हटलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर बागेश्वर बाबा हा महाराष्ट्रातून पळून गेला होता मात्र आता सच्चिदानंद गुरुदास बाबा हा महाराष्ट्रातीलच असल्याने त्याने हे आव्हान स्वीकारण्याची ताकद ठेवावी कुठेही पळून जाऊ नये असे देखील समितीकडून सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा