‘ चुलीवरील बाबा ‘ ची आणखी एक सुरस कथा चर्चेत , बाराव्या वर्षीच बाबाला..

शेअर करा

चुलीवरील बाबा

अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील चुलीवरील बाबा चांगलाच चर्चेत आलेला असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर या बाबाने ‘ नर्मदा परिक्रमा ‘ असे गोंडस नाव आपल्या प्रयाणाला देत तेथून पलायन केलेले आहे . बाबाच्या आश्रमात लावलेल्या फलकावर बाबाच्या इतिहासाबद्दल अनेक चमत्कारिक दावे करण्यात आलेले असून सध्या हा फलक देखील चांगलाच चर्चेत आलेला आहे.

चुलीवरील बाबा चर्चेत आला त्यावेळी त्याने, ‘ कधी कधी आपल्या अंगात दैवी शक्ती येते आणि आपल्याला परिस्थितीचे आणि आजूबाजूचे काही भान राहत नाही ‘ असे म्हटलेले होते आणि अशाच आशयाचा एक फलक त्याच्या आश्रमात लावलेला असून त्यामध्ये सुनील कावलकर उर्फ गुरुदास बाबा याला वयाच्या 12 व्या वर्षी अनेक देवता आणि संतांचा कृपाशीर्वाद मिळालेला आहे असे म्हटलेले आहे. गावातील नागरिकांनी देखील बाबाच्या म्हणण्यावर यावर विश्वास ठेवला नाही मात्र बाबाचा बराच भक्तगण गावच्या बाहेरचा असल्याची माहिती समोर आली आहे .

गुरुदास बाबाच्या आश्रमात आत्तापर्यंतचे बाबाचे जीवन कार्य दर्शवणारे फलक लावलेले असून त्यामध्ये बाबाला वयाच्या बाराव्या वर्षी अनेक देवता आणि संतांचा आशीर्वाद मिळाला असे म्हटलेले आहे. बाबाला कृपा आशीर्वाद मिळाल्याची गावातील नागरिकांना देखील याची माहिती कुठलीही माहिती नाही. 11 ऑगस्ट 2019 रोजी बाबाच्या मठात काही दरोडेखोरांनी दरोडा टाकलेला होता मात्र बाबा स्वतःवरील हल्ला रोखू शकले नाहीत आणि दरोडेखोर चार अंगठ्या आणि दीड लाखांची रोकड घेऊन तेथून पसार झाले अन शेवटी बाबाला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली होती. चुलीवरील बाबाचे अनेक कारनामे आणि सुरस कथा सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहेत.


शेअर करा