राहुरीत कुणी गुप्ता आहे का हो ? तोफखान्यात शिक्षकावर गुन्हा दाखल

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून एका परप्रांतीय शिक्षकाने चक्क जातीचा बनावट जात प्रमाणपत्रसादर केल्या प्रकरणी त्याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अभिषेक अभिनय गुप्ता ( मूळ राहणार बिहार राहणार सध्या जनता बाजार दत्त रोड सिडकोनगर नाशिक ) असे या शिक्षकाचे नाव असून सध्या तो नाशिक येथे वास्तव्याला आहे. मुंबईत तो शिक्षक म्हणून कार्यरत असून नाशिक जात पडताळणी समितीकडे त्याने यासंदर्भात दाखला मिळावा म्हणून अर्ज केलेला होता. समितीने त्याचा अर्ज फेटाळला त्यावेळी त्याने राहुरी तालुक्यातील एकरुखे येथील तेली समाजातील आपण रहिवासी आहोत असे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीला सादर केलेले होते.

जात पडताळणी समितीला राहुरी तालुक्यात गुप्ता नावाचा कुणी व्यक्ती असल्यावरून शंका आली म्हणून त्यांनी या संदर्भात तपासणी करण्याचे आदेश दक्षता पथकाला दिले आणि पथकाने एकरूखे गावात जाऊन चौकशी केली असता गुप्ता नावाची कुणीही व्यक्ती या गावात रहिवासी असल्याचे आढळून आले नाही तसेच यापूर्वी देखील गुप्ता नावाची कुणी व्यक्ति तिथे नव्हती हे देखील समोर आले. मूळचा अभिषेक गुप्ता हा बिहार येथील असून जात पडताळणी समितीकडे त्याने दाखल केलेला जातीचा दाखला चक्क बनावट असल्याचे समोर आलेले आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान 463 464 465 468470 471 42034 199 आणि 200 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा