पारनेर हादरलं..स्वतःच्या मुलाची हत्या करून बापाचे टोकाचे पाऊल

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे समोर आलेला असून एका बापाने आपल्या मुलाची हत्या करून त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केलेली आहे. मुलाच्या वडिलांनी हा प्रकार का केला याचा पोलीस सध्या तपास करत आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा इथे ही घटना घडलेली असून आरोपीने त्याच्या पत्नीला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने त्यांचा प्राण वाचलेला आहे, संतोष राघू रासकर असे आरोपी बापाचे नाव आहे.

पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे आरोपीने त्याचा पाच वर्षाचा मुलगा याची हत्या केली आणि त्यानंतर त्याची बायको सुजाता संतोष रासकर यांना देखील मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्यांनी स्वतः देखील आत्महत्या केली असून सुजाता यांच्यावर नगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे त्याने हा प्रकार का केला ? हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही .


शेअर करा