आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत , भाजपला नगर जिल्ह्यातून इशारा

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेसने आंदोलनास आणि पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सुरू केलेले आहे . सरकारी संस्थांच्या आडून विरोधी पक्षांवर चौकशीचा आणि कारवाईचा ससेमिरा केंद्र सरकारच्या आदेशावरून करण्यात आल्याची टीका होत असल्याने भाजपच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत. आपण स्वतः अडचणीत असताना भाजपकडून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आंदोलन करण्यात येत असून अशाच एका घटनेत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रकार करण्यात आलेला होता.

काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत यावर जोरदार टीका केलेली असून, ‘ स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या बाजूने लढणारे तुम्ही आम्हाला काय शिकवणार असे म्हटलेले आहे सोबतच ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात हे देखील सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, ‘ असा देखील एक इशारा त्यांनी दिलेला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की , ‘ आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन केले. अशा हीन पातळीवर उतरून सत्ताधारी पक्षाला अवकाळी पावसाने शेतक-यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही आणि महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचे पाप ही झाकता येणार नाही.आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत एवढं लक्षात ठेवा, आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले.ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात हे सत्ताक्षाने लक्षात ठेवावे. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या बाजूने लढणारे तुम्ही, आम्हाला काय शिकवणार ? ‘


शेअर करा