लग्नाचे आमिष दाखवून आठ महिने शारीरिक संबंध ठेवले..नंतर म्हणाला की ? : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

प्रेम प्रकरणानंतर सातत्याने लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील बारामती येथे घडला आहे. लग्नाच्या आमिषाने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी मळद ( तालुका बारामती ) येथील एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दरम्यान त्याला मदत केल्याप्रकरणी त्याचे आई-वडील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, यासंदर्भात 31 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. रंजीत मोहन मदने, नंदा मोहन मदने आणि मोहन मदने ( सर्वजण राहणार मळद तालुका बारामती )असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 20 जानेवारी ते 25 सप्टेंबर या कालावधीत महिलेच्या बारामती येथील घरी व त्यानंतर रंजीत मदने याच्या मळद येथील घरी हा प्रकार घडला.

रंजीत याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत मित्र राहत असलेल्या भाडोत्री खोलीवर, सातारा, जेजुरी तसेच बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील एका लॉजवर घेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर जळगाव कडेपठार येथील महादेव मंदिरात संबंधित महिलेच्या गळ्यात हार मंगळसूत्र घालत लग्न केले असल्याचे देखील भासवले. आपण नंतर नोंदणी पद्धतीने विवाह करू असेदेखील आश्वासन त्यांने दिले होते परंतु त्याच्याकडून वारंवार फोनवर अश्लील शिवीगाळ व मानसिक त्रास देण्यासह मारहाण केल्याचे देखील पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे


शेअर करा