फॅक्ट चेक : कोरोनावर उपचार म्हणून चर्चमध्ये डेटॉल पाजण्यात आल्याचा हा फोटो तुम्हाला आलाय का ?

शेअर करा

कोरोनाने पूर्ण जगात थैमान घातले असून अद्याप कोणालाही कोरोनावर काही इलाज सापडलेला नाही मात्र कोरोनाच्या अडून अनेक गावठी आणि रानटी प्रकार देखील कोरोनाच्या भीतीने लोकांना करण्यासाठी भाग पाडले जात आहे . अर्थात, लोकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याने हे तयार होतात देखील मात्र त्यातून कधी कधी जीव देखील गमवावा लागल्याचे प्रकार घडत आहेत . अशीच एक बातमी सोशल मीडियावर फिरत असून त्यात कोरोना बरा करण्यासाठी एका ख्रिश्चन धर्मगुरूने चक्क डेटॉल पाजल्याचा दावा करण्यात येत आहे .

काय लिहले आहे व्हायरल बातमीत ?

कोरोनाला रोखण्यासाठी चक्क दक्षिण आफ्रिकेतील चर्चमध्ये डेटॉल पाजण्यात आले आणि त्यानंतर 59 जणांचा मृत्यू झाला. दक्षिण आफ्रिकेचा कथित धर्मगुरू रुफस फाला याने कोरोनाव्हायरसला प्रतिबंधक औषध आणि चर्चवरील विश्वास दर्शविण्यासाठी म्हणून चर्चमधील सदस्यांना ब्लीच, डेटॉल पाजले. या कथित धर्मगुरूने आपल्या अनुयायांना असा विश्वास दिला होता की, डेटॉल त्यांना प्राणघातक कोरोनाव्हायरस आणि इतर कोणत्याही आजारांपासून दूर ठेवेल. आधीच वेगवेगळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना जंतुनाशकांद्वारे बरे करण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र प्रत्यक्षात डेटॉल प्यायल्यानंतर त्यातील 59 जणांचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. धर्मगुरू रुफस याने सांगितले होते की “मला माहित आहे डेटॉल हानिकारक आहे, परंतु देवाने मला ते वापरण्यास सांगितले. ते पिणारा मी पहिला व्यक्ती होतो , ”असा दावा त्याने केला आहे तसेच डेटॉल प्यायल्याने बरे झाल्याचे अनेकांनी मला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून सांगितले असे देखील त्याने म्हटले आहे .

काय हे फॅक्ट चेक रिपोर्ट ?

ह्या बातमीतील नाव आणि घडलेल्या घटना दोन्ही खऱ्या आहेत . रुफस फाला याने खरोखर आपल्या अनुयायांना डेटॉल पाजले होते मात्र ही घटना आताची नसून डिसेंबर २०१६ ची आहे. त्यावेळी कोरोनाचे नामोनिशाण देखील नव्हते . मात्र सिकनेस कमी व्हावा म्हणून ह्या धर्मगुरूने अनुयायांना डेटॉल पाजले होते.

पुढे २०१७ मध्ये आणखी एका धर्मगुरूने काही व्यक्तींना मोटर ऑइल देखील पाजल्याचा उल्लेख इंटरनेटवर उपलब्ध आहे .

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गावठी औषधे घेऊ नयेत यामुळे आपल्याला आपला प्राण गमवावा लागू शकतो .

संबंधित बातम्या

प्रेयसीला भेटण्याच्या ओढीने लॉकडाऊन तोडून रात्री घरातून निघाला मात्र पुढे जे घडले ये अकल्पित ?
https://nagarchaufer.com/?p=184

लॉकडाऊनदरम्यान सर्रास सुरु होते मसाज पार्लर,पोलिसी कारवाईत आठजण रंगेहाथ धरले : कुठली बातमी ?
https://nagarchaufer.com/?p=56

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51

अनैतिक संबंधातून कोरोनावर लस म्हणून पूर्ण कुटुंबाला फसवून दिले विष : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=20

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80

फक्त इनर वेअर घालून कोरोनाच्या उपचारात गुंतलेल्या एका नर्सचा फोटो तुम्हाला आलाय काय ? : सत्यपरिस्थिती काय ?
https://nagarchaufer.com/?p=131

बलात्कार करून तब्बल सात वर्षे देत होता पोलिसांना गुंगारा, मात्र ‘ ह्या ‘ चुकीने आला पोलिसांच्या जाळ्यात
https://nagarchaufer.com/?p=146

भाडेकरू म्हणून आली अन मालकीण बनली पण तरीदेखील होता पैशांचा हव्यास : उचलले धक्कादायक पाऊल
https://nagarchaufer.com/?p=198


शेअर करा