एकनाथ खडसे यांच्या ‘ ह्या ‘ व्हायरल संभाषणाची जोरदार चर्चा : काय आहे विषय नक्की

शेअर करा

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे महिनाभरात पक्ष सोडणार असून दुसऱ्या पक्षात काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे असा संवाद असणारी ऑडिओ क्लिप सध्या जळगाव परिसरात सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. खडसे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या अशी मागणी करत आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत असलेल्या भाजपमध्ये ज्यांनी पक्ष वाढवला त्यांना विसरण्याची परंपराच असल्याने खडसे जरी असे प्रकार फार गांभीर्याने घेत नसले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र भाजपवर नाराज आहेत.

अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या कार्यकर्त्यांने खडसेंची संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली मात्र त्यानंतर हा तरुण नॉटरिचेबल झाला आहे. याविषयी खडसे यांनी सांगितले की कार्यकर्ते अशाप्रकारची विचारना करत असतात तो कॉल चुकीचा असून ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज नाही

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी खडसे यांच्याशी साधलेला संवाद जसाच्या तसा

रोशन भंगाळे : हॅलो भाऊ रोशन भंगाळे बोलतोय वरणगाव वरून. भाऊ आपला निर्णय घ्या काहीतरी. आता पण त्यांनी काहीच पद नाही दिल. पंकजा मुंडेना पद दिले
एकनाथ खडसे: समजा उद्या ठरलं जायचं
रोशन भंगाळे: भाऊ जायचं का नक्की
एकनाथ खडसे : पण गेल्यानंतर काय करायचं ते सांग तू
रोशन भंगाळे: त्यांनी आता पण डावललं भाऊ तुम्हाला. आम्ही खूप नाराज झालो आहोत
एकनाथ खडसे: पण ते शेवटी पद वगैरे काय ठरलं पाहिजे की नाही ? का जाऊन लाचार सारखे बसायचे
रोशन भंगाळे: हो भाऊ ते पण खरे आहे पण काहीतरी निर्णय घ्या भाऊ
एकनाथ खडसे: या महिन्याभरात जाणार आहे पण ते पद वगैरेच ठरू दे

( ह्या संवादाची चर्चा जळगाव परिसरात चांगलीच रंगली आहे )


शेअर करा