काळ्या जादूच्या उद्देशाने हळदकुंकू वाहिलेल्या कैऱ्या अंनिसने चावून खाल्ल्या

शेअर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली तरी देखील नागरिकांच्या मानसिकतेवर अंधश्रद्धेचा पगडा काही कमी होत नाही. नाशिक येथे एक असाच प्रकार समोर आलेला असून आपल्या कुटुंबातील विघ्न दूर व्हावे किंवा इतर कुटुंबावर विघ्न यावे या उद्देशाने रस्त्याच्या कडेला काही कैऱ्या हळद-कुंकू लावलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या होत्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तेथे पोहोचून हा डाव उधळून लावलेला असून या कैऱ्या कापून खाल्लेल्या आहेत. नागरिकांना अशा पद्धतीने घाबरवण्याचे कोणी प्रकार केले तर त्याला नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे देखील आवाहन त्यांनी केलेले आहे.

सातपूर परिसरातील सोमेश्वर कॉलनी येथे चार चाकी गाड्या पार्क करत केल्या जात असलेल्या एका रस्त्याच्या कडेला काही अज्ञात व्यक्तींनी एका पानावर सात कैऱ्या आणि त्यावर दगड लावून हळद-कुंकू ठेवलेले होते तसेच तिथे नैवेद्य देखील ठेवण्यात आलेला होता. चार चाकी पार्किंगच्या जागेवर अशा पद्धतीने पूजा केलेली लक्षात आल्यानंतर अंधश्रद्धेचा किंवा करणीचा हा प्रकार असण्याची शक्यता असल्याची चर्चा परिसरात होऊ लागली आणि पथकाने तिथे धाव घेतली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, प्राध्यापक डॉक्टर सुदेश घोडेराव, महेंद्र दातरंगे , कोमल वरदे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी तिथे सात कैऱ्या, हळद-कुंकू लावलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या होत्या. त्यांनी तात्काळ नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आणि नागरिकांच्या समोरच या कैऱ्यांचा आस्वाद घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काळी जादू करण्याच्या उद्देशाने वाहिलेल्या या कैऱ्या लोणचं बनवून खाल्ल्यानंतर तरी नागरिकांमध्ये अंधश्रद्धा कमी होईल अशी आशा आहे.


शेअर करा