नवऱ्याने चक्क टॉयलेट बाथरूममध्ये लावले सीसीटीव्ही , जगायचं कसं ?

शेअर करा

आपल्या पत्नीबद्दल प्रत्येक व्यक्ती भाऊक असतो आणि तिला कुठली इजा होऊ नये म्हणून तो सतत तिच्या पाठीमागे उभा असतो. आपण घरी नसताना त्याला पत्नीच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असते त्यामुळे काही ठिकाणी सीसीटीव्ही देखील लावून पती काळजी घेतात मात्र एका व्यक्तीने या प्रकरणात अक्षरशः कळस करत हॉल बेडरूम टॉयलेट बाथरूम इथपर्यंत सीसीटीव्ही लावले. महिलेने अखेर पोलिसात धाव घेत त्याचा आपल्यावर संशय आहे म्हणून तो असे करत आहे असे म्हटलेले आहे.

मध्य प्रदेशातील छतरपुर येथील ही घटना असून महिने एसपी कार्यालयापर्यंत दाखल होत तक्रार दिलेली आहे आणि आपल्या नवऱ्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे सदर पती हा शिक्षक म्हणून कार्यरत असून मुकरावा गावात तो नोकरी करतो . सोळा वर्षांपूर्वी त्याचे तक्रारदार महिलेसोबत लग्न झालेले होते त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले आणि एकमेकांवर संशय आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले.

महिलेच्या म्हणण्यानुसार आपल्या पतीचे त्याच्या शाळेतील एका शिक्षिकेसोबत अफेअर सुरू आहे त्यामुळे आमच्यात वाद होतो मात्र आता आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतलेला असून निर्णय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकाच घरात वेगवेगळे राहत आहोत. मी मुलांसह सोडून जावे अशी त्याची इच्छा आहे कारण मी सोडून गेल्यानंतर त्याला मोकळे रान मिळणार आहे.

महिला पुढे म्हणते की त्याने माझ्या बेडरूम आणि बाथरूम टॉयलेट मध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत त्यामुळे आपले जगणे मुश्किल झालेले आहे . सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याला नक्की काय पाहायचं आहे . त्याचा हेतू काय आहे ? त्यामुळे माझी प्रायव्हसी अडचणीत आलेली आहे असे देखील तिने म्हटलेले आहे . महिलेच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी असे देखील तिने दिलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे.


शेअर करा