माऊली महाराजाने अल्पवयीन मुलीला पळवलं , नगर पासिंगची गाडी अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली असून आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी एका कुटुंबाच्या घरी येणाऱ्या भोंदू बाबाने त्याच कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिला पळवून नेलेले आहे . केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना असून अखेर अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून या भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, माऊली धोंडीराम भोसले महाराज ( राहणार मगरवाडी तालुका अंबाजोगाई ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून केज तालुक्यातील एका गावात आजारी व्यक्तीवर उपचार करण्यासाठी हा तक्रारदार कुटुंबीय यांच्या घरी येत होता . घरात असलेल्या अल्पवयीन मुलीला या बाबांने फुस लावली आणि त्यानंतर त्याच्या चारचाकी गाडीत बसून त्याने तिच्यासोबत पलायन केलेले आहे.

आजारी असलेल्या वडिलांची देखभाल करणारी ही मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेली होती त्यावेळी या भोंदू बाबाने तिला त्याची इंडिका कार एम एच सोळा एजे 6500 यामध्ये बसवून पळवून नेलेले असून ही बाब मुलीच्या काकाच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी या कारचा पाठलाग केला मात्र तोपर्यंत हा बाबा पळून गेलेला होता.

अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात माऊली धोंडीराम भोसले( महाराज राहणार मगरवाडी तालुका अंबाजोगाई ) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वृत्त लिहीपर्यंत हा बाबा हाती आलेला नाही .


शेअर करा