
नगर शहरात गेल्या काही वर्षांपासून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून आता चक्क महिला पोलिसांवर देखील हात उचलण्यापर्यंत समाजातील अपप्रवृत्तींची मजल गेलेली आहे. नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात अशीच एक घटना समोर आलेली असून पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून महिला पोलीस देखील सुरक्षित नसल्याचे शहरात चित्र आहे. तक्रारदार महिला यांनी औषधोपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दिलेली असून पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपासाला सुरुवात केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदार महिला पोलिसाला आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे या एफआयआरमध्ये नमूद केलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे करत आहेत.
काय आहे तक्रारदार महिला यांची तक्रार ?
मी सौ. निलीमा मनोज करबरे ( वय 32 शिवाजी नगर, नगर-कल्याण रोड, अहमदनगर ) समक्ष कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर राहून फिर्याद देते की, मी वरील ठिकाणी पती मनोज करबरे व दोन मुले शुभ व योग असे एकत्रित कुटूंबासह राहात आहे. माझा मुलगा शुभ हा सविता रमेश फिरोदिया प्रशाला माळीवाडा अहमदनगर येथे इयत्ता 2 री मध्ये शिकत आहे. तरीच आमचे शेजारी 01) अतिष दिपक टाक 02) आशिष दिपक टाक 03) वनिता आतिष टाक 04) स्वाती उर्फ साक्षी आशिष टाक 05) आयुष आतिष टाक असे टाक यांच्या मुलाबाळासोबत एकच राहतात.
दिनांक 09/03/2023 रोजी दुपारी 12/30 बांचे सुमारास मी माझा मुलगा शुभ मनोज करवरे यास मी माझ्या मोपेड गाडीवरून घरी घेवून रस्त्याने येत असतांना आमचे शेजारी राहणारी टाक यांचे घरासमोर आले असता त्यावेळी वनिता आतिष टाक हिचा मुलगा आयुष टाक हा त्यांच्या दारात उभा होता त्याने आम्हाला पाहुन मला माझ्या मुलास विनाकारण शिवी दिली त्यावेळी मी माझी मोपेड गाडी थांबवुन आयुष यास तु मला व माझ्या मुलाला विनाकारण शिवी का दिली अशी विचारणा केली असता त्यावेळी तेथे घरातुन वनिता टाक व साक्षी टाक या दोघीही बाहेर आल्या व त्यांनी मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन वनिता हिने माझा हात धरून माझ्या मोपेड गाडीवरून खाली ओढले व मला लाथाबुक्यांनी मारहाण केली व वनिता टाका व साक्षी यांनी माझे डोक्याचे केस धरून माझे तोंड माझ्या गाडीवर जोरात आदळले त्यावेळी उजव्या बाजुचा वरचा एक दात निखळून मला गंभीर दुखापत झाली त्यानंतर वनिता हिने माझ्या कानावर जोराचा बुक्का मारून हातावर बोचकारत जोराचा चावा घेतला त्यावेळी मी त्यांचे तावडीतून कसेबसे सोडवुन माझा मुलगा शुभ यास घरी सोडले व माझे पती मनोज यांना फोन करुन घरी बोलावून घेतले व घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगीतली.
माझे पती मनोज यांनी मला तक्रार देणे कामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेवून आले त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशन येथे तकार दिली सदर वेळी पोलीसांनी मेडिकल यादी दिली व पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे पाठवले मी व पती असे सिव्हील हॉस्पिटल येथे जात असतांना मला थोड़ी चक्कर आल्यासारखी जाणवल्याने व माझा लहान मुलगा योग हा घरी असल्याने मधुनच पुन्हा घरी गेलो थोडी विश्रांती करून त्यानंतर जेवण करून आम्ही उपचाराकामी मेडिकल यादी घेवुन सिव्हील हॉस्पिटल येथे जावून उपचार घेतले, त्यानंतर आम्ही हॉस्पिटल मधुन उपचार घेवुन घरी जात असतांना टाक यांचे घराबाहेर 01) अतिष दिपक टाक 02) आशिष दिपक टाक 03) वनिता आतिष टाक 04) स्वाती (साक्षी) आशिप टाक असे उभे होते. आम्हाला दोघांना पाहुन अतिष दिपक टाक व आशिष दिपक टाक यांनी आमचा रस्ता आडवून आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली सोबतच तुम्हाला आम्ही पाहून घेऊ तुमचा काटा काढू अशी धमकी दिली त्यावेळी मी व पती त्याकडे दुर्लक्ष करून आमचे घरी निघुन गेलो. आम्ही टाक यांचे विरुध्द सकाळी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असल्याने आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला तक्रार देणे कामी गेलो नाही.
आज दिनांक 19/05/2023 रोजी मागील वेळी पोलीस स्टेशन येथुन मेडिकल यादी घेवुन सिव्हील हॉस्पिटल मध्ये औषधोपचार घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने मी वरील लोकांविरुद्ध तक्रार देणेकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार देणे कामी आले असून माझी वरील फिर्याद माझे सांगणेप्रमाणे संगणकावर टंकलिखीत केली असुन ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.