बसमध्येच सीटवर बसून महिलेसमोर ‘ नको तो ‘ प्रकार , बसमधून पळाला पण..

महिलांसोबत गैरवर्तन हा अत्यंत गंभीर गुन्हा असून अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात मात्र त्याचा आरोपींना फायदा होतो. केरळमधील एरणाकुलम जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आलेली असून बसमध्ये एका तरुणीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये तरुणीने बनवला त्यानंतर या संदर्भात कंडक्टरला कल्पना दिली त्यानंतर कंडक्टरने पोलिसात तक्रार दाखल करायचे आहे का ? असे विचारल्यानंतर तरुणीने हो म्हटल्यानंतर आरोपी बसमधून उडी टाकून पळून गेलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, त्रिशूल येथून कोची येथे बस चाललेली असताना आरोपी असलेला सवाद शाह ( वय 27 ) हा बसमध्ये चढला आणि अन्य महिला आणि प्रवासी यांच्यामधील सीटवर बसत बस निघताच अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. तक्रारदार असलेली महिला नंदिता यांनी सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले मात्र त्यानंतर त्याचाच तसाच प्रकार सुरू असल्याचे पाहून त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.

महिलेने आरडाओरडा केल्यानंतर कंडक्टरने हस्तक्षेप करत पोलिसात तक्रार दाखल करायचे आहे का ? असे विचारल्यानंतर महिलेने होकार दिला आणि पोलीस स्थानकाकडे बस घेण्यात सांगितले मात्र याच दरम्यान सिग्नलवर बस थांबण्याचा फायदा घेत आरोपी पळून गेला. पोलिसांनी त्याला त्यानंतर अटक केलेली असून अशा आरोपींच्या विरोधात महिलांनी घाबरून न जाण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा देखील होण्याची गरज आहे.