लग्नघटिका समीप आली अन प्रेयसी पोलीस घेऊन आली , राहात्यात अजब घटना

नगर जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आलेला असून चालू मिरवणुकीतून एका नवरदेवाला ताब्यात घेण्याचा प्रकार राहता इथे घडलेला आहे . लग्नाला अवघे काही मिनिट बाकी असताना अक्षदा अंगावर पडायच्या आत या नवरदेवाला पोलिसात आणण्यात आलेले आहे अखेर त्याचे लग्न देखील झाले नाही त्यामुळे आलेल्या वराकडील व्यक्तींच्या उत्साहावर देखील विरजण पडलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, लग्नघटिका समीप आली असताना नाशिक येथील एका तरुणीने नवरदेवासोबत आपले प्रेमसंबंध असून लग्नाचे आमिष दाखवून त्याने माझ्यावर अनेकदा अत्याचार केलेला आहे आणि माझी फसवणूक केली अशी तक्रार राहता पोलीस स्टेशनला दिली होती त्यानंतर नाशिक येथील रहिवासी असलेला हा तरुण राहता येथे लग्नासाठी आलेला असतानाच त्याचे मिरवणूक सुरू असताना उच्चशिक्षित 26 वर्षांची तरुणी पोलिसांना घेऊन मांडवात पोहोचली आणि अखेर या नवरदेवाची पोलीस स्टेशनला रवानगी करण्यात आली.

नवरदेव पोलीस स्टेशनला गेल्यानंतर नक्की काय प्रकार झालेला आहे हे बराच वेळ वर्हाडी मंडळीच्या लक्षात आले नाही मात्र त्यानंतर हा प्रकार समोर येताच वधूच्या कुटुंबीयांनी त्याच्यासोबतचे लग्न मोडलेले आहे. तरुणीला येण्यास थोडासा उशीर झाला असता आणि पोलिसांनी टाळाटाळ केली असती तर या नववधूला आयुष्यभर मनस्ताप सहन करावा लागला असता मात्र पोलिसांनी विक्रमी वेळेत नवरदेवाला ताब्यात घेतले आणि त्यानंतर झाला प्रकार सर्वांच्या समोर आला आणि अखेर हे लग्न कॅन्सल झाले.

नववधूचे देखील लग्न कसे होईल याची चिंता सर्वांना होती. नववधूचे कुटुंबीय देखील याच चिंतेत होते दरम्यान नात्यातीलच एक मोठ्या मनाचा नवरदेव पुढे आला आणि त्याने सर्व वर्हाडी मंडळीच्या साक्षीने अवघ्या काही मिनिटात तिच्यासोबत लग्न लावले तर दुसरीकडे ज्याच्यासोबत लग्न लावणार होते तो मात्र पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत बसलेला होता.