वडील उठतील होतील म्हणून मुले बसून , वडिलांनी कधीच जग सोडलेलं

देशात एक हृदयद्रावक अशी घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून उत्तर प्रदेशातल्या मोरादाबाद इथे रेल्वेस्थानकातील फलट क्रमांक दोनवर एका प्रवाशाचा मृतदेह आढळून आलेला आहे. बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून हा व्यक्ती तिथे पडून होता. रेल्वेचे पथक 12 वाजता पोहोचले त्यावेळी मृतदेहाजवळ दोन मुले बसलेली होती शिवाय काही औषधाचे कागद , एक बॅग खाण्याची पिशवी आणि आधार कार्ड तिथे आढळून आलेले आहे.

वडिलांच्या मृतदेहाजवळ बसलेल्या मुलांमध्ये एक मुलगा दोन वर्षांचा तर दुसरा मुलगा तीन वर्षांचा होता . आपले वडील झोपलेले आहेत असा त्यांचा समज झालेला होता मात्र त्यांच्या वडिलांनी केव्हाच जग सोडलेले होते. आपले वडील उठल्यानंतर आपल्याला कुठेतरी घेऊन जातील अशी त्यांची आशा होती मात्र रेल्वे चाइल्ड लाईन आणि महिला हवालदार यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते मयत झालेले होते.

मयत व्यक्ती यांच्याकडे आधार कार्ड आढळून आलेले असून त्यावर अजमेरी गेट नवी दिल्ली असा पत्ता आहे. सोनू असे त्यांचे नाव असून त्यांचे वय 45 वर्षे आहे . मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी रेल्वे चाइल्डलाईन पथक आणि जीआरपी पथक दिल्लीला रवाना झालेले आहे. मुलांची आरोग्य तपासणी केली असून सध्या मुले रेल्वेच्या ताब्यात आहेत.

मयत व्यक्तीजवळ आढळून आलेल्या औषधाची कागदपत्रे पाहून त्यांच्या आजाराबद्दल अंदाज लावण्याचे प्रयत्न सुरू असून मुलांना आत्तापर्यंत मम्मी आणि पप्पा हे दोनच शब्द बोलता येतात त्यामुळे काहीही माहिती मुलांकडून अद्यापपर्यंत तरी मिळालेली नाही. मयत व्यक्तीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार असून दोन्ही मुलांनी आपले वडील गेल्याचे लक्षात आल्यानंतर काहीही खाल्लेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून आता तपास सुरू आहे.