पाथर्डीचा सोहेल फकीर आता सहाय्यक नगररचनाकार

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील येथील श्री तिलोक जैन विद्यालय येथे पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले श्री दिलावर फकीर सर यांचे चिरंजीव आणि पाथर्डी तालुक्यातील सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले श्री सी.डी.फकीर साहेब यांचा नातू सोहेल दिलावर फकीर याने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या सेवेत वि.ज (अ) प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळविला आहे .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत प्रथम प्रयत्नात मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल सोहेल फकीर याचे कौतुक करण्यात येत असून नगररचनाकार महाराष्ट्र शहर नियोजन व मूल्यनिर्धारण सेवाश्रेणी एक (राजपत्रित) परीक्षेत महाराष्ट्रात एकविसावा, तर वि.ज (अ) प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून शासकीय सेवेत कार्यरत करण्याचा ध्यास जिद्दीने पूर्ण केला आहे.