सुपा एमआयडीसीत कंत्राटदाराला भेटायला बोलावलं अन ..

शेअर करा

नगर पुणे रोडवर असलेल्या सुपा एमआयडीसी इथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून कंपनीची कंत्राटे आणि त्यातून मिळणारी कामे यातून बहुतांश वाद होत असल्याचे दिसून येत आहे अशातच एका बांधकाम कंत्राटदारावर कोयत्याने प्राण हा प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सुपा एमआयडीसी येथे घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शुभम राघू पाठक ( राहणार कुकडी कॉलनी शिरूर ) असे जखमी झालेल्या कंत्राटदाराचे नाव असून जयेश गायकवाड ( राहणार लाटेओळी शिरूर ), कृष्णा विठ्ठल मुरवदे ( राहणार कुरुंद तालुका पारनेर ) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सुपा एमआयडीसी येथे एका कंपनीत पाठक यांचे बांधकाम सुरू आहे त्यावेळी त्यांना गायकवाड याने फोन करून तुम्हाला बांधकाम साहित्य पुरवतो, योग्य दरात सर्व मटेरियल देतो असे सांगत चर्चा करण्यासाठी समिंदा कंपनी समोर बोलावलेले होते . गायकवाड तिथे इतर दोन जणांसोबत पोहोचला त्यावेळी किमतीवरून वाद झाल्यानंतर मुरवदे याने पाठक यांच्यावर हॉकी स्टिक आणि गायकवाड याने कोयत्याने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दोघेही पळून गेले . सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भिंगारदिवे पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.


शेअर करा