समाजबांधवांनी प्रेमविवाह देखील लावून दिला पण कोणाची नजर लागली ?

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात समोर आलेले असून धारणी मार्गावरील सापन प्रकल्पात गुरुवारी सकाळी एका पती-पत्नीचा मृतदेह आढळून आलेला आहे. चिखलदरा तालुक्यातील चिंचखेडा येथील हे जोडपे असून मंगळवारी दुपारपासून ते घरातून निघून गेलेले होते.

उपलब्ध माहितीनुसारमी, विकी मंगलदास बारवे ( वय 23 वर्ष) आणि तुलसी विकी बारावे ( वय 21 वर्ष राहणार चिंचखेडा ) अशी मयत पती पत्नींची नावे असून दोघेही एकाच समाजाचे आहेत सोबतच त्यांचे प्रेम असल्यानंतर अखेर सर्व समाज बांधवांनी मिळून त्यांचा विवाह अकरा महिन्यापूर्वी लावून देखील दिलेला होता.

विकी हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा. त्याला वडील नसून आई आणि भाऊ मध्य प्रदेश येथे एका लग्नासाठी गेलेले होते त्यानंतर विकी आणि तुलसी यांनी घराला कुलूप लावले आणि दुचाकीवरून ते तिथून निघून गेले. त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज असून घटनास्थळी त्यांची दुचाकी आढळून आलेली आहे.

सपान धरण प्रकल्पाकडे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या काही पुरुष आणि महिलांना बंद असलेला मोबाईल आढळून आलेला होता. तो ऑन केल्यानंतर त्यांनी पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला . अवघ्या काही मिनिटात पोलीस तिथे पोहोचले त्यावेळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे . सदर घटनाही आत्महत्या आहे की घातपात याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.