‘ तुझ्या बायकोला पळवून नेईन ‘ विवाहितेचा पती समजावत असतानाच..

एकतर्फी प्रेमातून एका महिलेच्या घरात घुसून ‘ तू मला खूप आवडतेस माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर मी तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेल नाहीतर तुझ्या मुलांना मारून टाकेल ‘ असे म्हणत एका विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे समोर आलेला आहे . विवाहित महिलेच्या पतीने देखील या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने त्यालाही धमकी दिली.

आरोपीने विवाहित महिलेच्या पतीला धमकी देताना ‘ मी तुझ्या पत्नीला पळून घेऊन जाईल . माझ्या खूप ओळखी आहेत तू काहीच करू शकत नाही ‘ असे देखील तो म्हणाला . रविवारी संध्याकाळी एका व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

विवाहित तिच्या पतीसह मुलांसोबत चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहते. 30 एप्रिल रोजी ती नेहमीप्रमाणे घरी असताना सकाळी दहाच्या सुमारास आरोपी विजय रघुनाथ बोरसे हा तिथे आला आणि त्याने विवाहितेला तू मला खूप आवडतेस. माझ्यासोबत शरीर संबंध ठेव असे म्हणत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाचे वर्तन केले आरोपीने तिला त्यानंतर जर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाहीत तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईल अशी देखील धमकी दिली.

11 मे रोजी आरोपी पुन्हा विवाहित महिलेच्या घरी आला आणि त्याच पद्धतीने त्याने वर्तन सुरू केले. विवाहित महिलेचा पती यांनी विजय रघुनाथ बोरसे याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने’ तुझ्या पत्नीला मी पळून घेऊन जाईल माझ्या खूप ओळखी आहे तू काहीच करू शकत नाही ‘ असे देखील तो म्हणाला त्यानंतर विवाहित महिलेला त्याने अनेकदा फोन करून त्रास देखील दिलेला असून त्यामुळे अखेर पीडित परिवाराने पोलीस ठाणे गाठत त्याच्या विरोधात 21 मे रोजी तक्रार दिलेली आहे . चाळीसगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत .