‘ ऑनलाईन काम ‘ महिला अडकत अडकत गेली आणि अखेर..

शेअर करा

ऑनलाईन काम करून पैसे मिळवा अशा स्वरूपाच्या अनेक जाहिराती आपण सोशल मीडियात वाचत असतो त्यातून अनेक फसवणुकीची देखील प्रकरणे समोर आलेली असून असेच एक नवीन प्रकरण आता नागपूर इथे समोर आलेले आहे. एका महिलेची पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने एका महिलेची तब्बल 12 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आलेली आहे. नागपूर कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कल्याणी शरद लाकडे ( वय 34 ) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून त्यांना मोबाईल अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवरून पार्ट टाइम जॉबसाठी विचारणा झालेली होती. घरून काम करायचे आहे असे समोरील व्यक्तीने सांगितल्यानंतर कल्याणी यांनी त्याला होकार दिला . त्यांना चित्रपटाचे रेटिंग अशा संदर्भात तुम्ही टास्क पूर्ण केले तर तुम्हाला बोनस मिळेल असे देखील सांगितले त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी एक लिंक पाठवण्यात आली त्यावर तक्रारदार महिला यांनी आवश्यक ती माहिती भरलेली होती.

आरोपींनी सुरुवातीला त्यांना बोनसची रक्कम दिली त्यामुळे कल्याणी यांचा आरोपींवर विश्वास बसला त्यानंतर वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे काम देण्याच्या बदल्यात पैसे घेण्यात आले अशाच पद्धतीने 13 मे पर्यंत तब्बल 12 लाख 80 हजार रुपयेपर्यंत त्यांनी या व्यवसायात रक्कम गुंतवलेली होती मात्र त्यानंतर ज्या फोनवरून संपर्क करण्यात आलेला होता ते फोन बंद असल्याचे आढळून आले त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

ऑनलाईन काम कमी कष्टात असल्याने अनेक नागरिक अशा कामांच्या शोधात असतात अशा ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी काही रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात येते. सोबतच त्यांच्याकडून त्यांच्या बँकेचे खाते या संदर्भात देखील माहिती मिळवण्यात येते आणि त्यानंतर बोनस म्हणून सुरुवातीला काही रक्कम देखील त्यांना देण्यात येते त्यावरून समोरच्या व्यक्तीचा आपण ज्यांच्या सोबत काम करत आहोत ही एक प्रामाणिक कंपनी आहे असा समज तयार होतो त्यानंतर काम देण्यासाठी डिपॉझिट म्हणून काही रक्कम तुम्हाला आधी आमच्याकडे ठेवावी लागेल असे सांगत ही रक्कम ठेवली तरच तुम्हाला पुढील काम देऊ असे आमिष दाखवण्यात येते आणि इथेच अनेक नागरिक फसतात आणि त्यानंतर आपली डिपॉझिट म्हणून दिलेली रक्कम गमावून बसतात त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे .


शेअर करा