तुम्ही आमच्या मुलीला त्रास का देता ?, राहुरीत घरात घुसून मारहाण

नगर जिल्ह्यात राहुरी इथे एका घरात घुसून पती-पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली सोबतच फिर्यादी महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाचे वर्तन करण्यात आले. राहुरी तालुक्यातील एका गावात 14 मे रोजी ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, भारत भाऊसाहेब गायकवाड , अनिल भाऊसाहेब गायकवाड , प्रसाद अण्णासाहेब पाळंदे, रेखा अण्णासाहेब पाळंदे ,सुनिता भारत गायकवाड ,दिपाली अनिल गायकवाड ( सर्वजण राहणार उंबरे तालुका राहुरी ) यांच्याविरोधात विनयभंग मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

14 तारखेला रात्री अकराच्या सुमारास चाळीस वर्षीय महिला आणि तिच्या घरातील लोक हे घरात असताना आरोपी अनधिकृतपणे महिलेच्या घरात घुसले आणि तुम्ही आमच्या मुलीला त्रास का देता ? यावरून फिर्यादी महिला आणि तिच्या पतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली . महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन देखील करण्यात आले त्यानंतर उद्या जर तुम्ही गावात दिसलात तर तुम्हाला मारून टाकू तुमचे घरदार देखील पेटवून देऊ अशी धमकी देण्यात आली.

घटनास्थळी झालेल्या झटापटीत फिर्यादी महिलेच्या बहिणीच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाण गहाळ झालेली आहे त्यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठत आरोपींच्या विरोधात फिर्याद दिलेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे.