चालत्या गाडीवर आंघोळ करणारा ‘ तो ‘ तरुण ताब्यात , आता म्हणतोय..

शेअर करा

काही दिवसांपूर्वी उल्हासनगर येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला होता . उल्हासनगर येथील एका रस्त्यावर उन्हाचा प्रभाव दाखवण्यासाठी या तरुणाने चक्क स्कूटर चालवत असताना आंघोळ केली होती आणि त्याचा व्हिडिओ त्याच्या मित्राला रेकॉर्ड करायला सांगितले होते. भर उन्हात रस्त्यावर एका स्कुटीवर तरुण समोर बसलेला होता तर त्याची मैत्रीण त्याला पाठीमागून त्याच्या अंगावर पाणी होत होती.

उपलब्ध माहितीनुसार, आदर्श शुक्ला असे या तरुणाचे नाव असून अवघ्या पंधरा सेकंदाच्या व्हिडिओत शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला हा तरुण पाण्याने भरलेली बादली आणि पाठीमागे मग घेऊन जाताना दिसत होता. एक हात सोडून तो पाणी अंगावर घेतो आणि दुसऱ्या हाताने गाडी चालवतो त्याच्या एका मित्राने हा व्हिडिओ शूट केला आणि अवघ्या काही मिनिटात हा जोरदार व्हायरल देखील झाला.सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते आणि अखेर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात वाहतूक पोलिसांना यश आलेले असून धोकादायकपणे वाहन चालवणे आणि इतर प्रवाशांना धोका निर्माण केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आलेला आहे .

सदर तरुणाने एक माफीनामा पोलिसांना दिलेला असून त्यात , ‘ व्हिडिओत माझा इतरांना इजा पोहोचेल असा हेतू नव्हता, तर मी फक्त करमणूक म्हणून हा व्हिडिओ चित्रित केला होता. मात्र हेल्मेट न घालता गाडी चालवणं, हात सोडून गाडी चालवणं आणि रस्त्यावर पाणी सांडून इतरांना इजा होईल, असं कृत्य माझ्याकडून घडलं. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. मला पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं ‘, असे म्हटलेले आहे .


शेअर करा