प्रेमविवाहातून जन्मलेल्या मुलीला स्वतःच्या बापाने कलाकेंद्रात विकलं

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापूर इथे समोर आलेला असून प्रेमविवाहातून जन्मलेल्या अल्पवयीन मुलीला पैशासाठी कलाकेंद्रात पाठवल्यानंतर तिच्यावर कला केंद्रात म्हणून आलेल्या चार जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर घटनेत पीडित मुलीचा पिता , कला केंद्राच्या पाच चालक आणि चार ग्राहक अशा सुमारे दहा जणांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने आरोपी पतीसोबत 2005 साली प्रेमविवाह केलेला होता त्यानंतर त्यांना मुलगी झाली मात्र दोघांमध्ये पटत नसल्याकारणाने ते वेगवेगळे राहत होते. पीडित मुलगी ही तिच्या वडिलांसोबत राहत होती त्यानंतर त्याने या मुलीला चक्क वेगवेगळ्या जिल्ह्यातील कला केंद्रात पाठवले तिथे तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार घडलेला आहे.

आरोपी पित्याने या मुलीला पुणे ,सोलापूर , बारामती येथील कला केंद्रात पाठवले आणि या बदल्यात कला केंद्रचालक यांच्याकडून पैसे घेतले. पैशासाठी या मुलीला नाचवण्यात देखील आले आणि तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आले. मुलीच्या आईने फिर्याद दिलेली असून छाया नेर्लेकर ( राहणार सोलापूर ) ,धोंडराईकर ,अनिता वाघोलीकर ,मीना पारगावकर ( राहणार नगर ) व पीडितेवर अत्याचार करणारे चार अनोळखी लोक अशा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा