
गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्यातील संगमनेर शहराची ओळख ही अवैध कत्तलखाना शहर अशी होत असून या ओळखीला दुजोरा देणारी एक घटना संगमनेर शहरात पुन्हा एकदा समोर आलेली आहे. संगमनेर शहर पोलीस यांनी कारवाई करत सुमारे एक लाख 12 हजार रुपये किमतीचे साडेचारशे किलो गोमांस मंगळवारी सोळा तारखेला शहरातील जमजम कॉलनी येथे जप्त केलेले आहे . एका व्यक्तीच्या विरोधात शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राजीक रजाक शेख ( राहणार संगमनेर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून गुन्हा दाखल झाल्याचे समजतात आरोपी फरार झालेला आहे. जमजम कॉलनी परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याप्रकरणी पोलिसात माहिती मिळालेली होती त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार ,पोलीस कॉन्स्टेबल खाडे यांनी तात्काळ या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी पोलीस आल्याचे समजताच आरोपी पळून गेलेला असून सुमारे एक लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .