गर्भवती असताना डोळे भरून सूर्यग्रहण पाहिलं , डिलिव्हरी झाली अन..

शेअर करा

एकविसाव्या शतकात अंधश्रद्धेला तीलांजली देणाऱ्या अनेक कौतुकास्पद घटना समोर येत असून अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातून समोर आलेली आहे. अंधश्रद्धा किती पोकळ आहे याची प्रचिती देणारी ही घटना असून सांगली जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेने सूर्यग्रहण पाहिले आणि ग्रहणात जी कामे टाळली जातात ती सर्व कामे देखील केली त्यानंतर अखेर तिने अखेर एका गोंडस मुलीला जन्म दिलेला असून गरोदर असताना चौथ्या महिन्यात तिने ग्रहण पाहण्याचा आनंद लुटलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार, पूजा ऋषिराज जाधव असे या महिलेचे नाव असून देशात सूर्यग्रहण पाहणे आजही अशुभ मानले जाते. गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण पाहू नये तसेच यादरम्यान भाजी चिरणे अशी कामे करू नयेत असे अनेक स्व:घोषित दंडक धर्म मार्तंड यांनी घालून दिलेले आहेत मात्र पूजा यांनी या सर्व प्रकाराला तिलांजली देत सूर्यग्रहणाशी डोळे मिळवले त्यानंतर नेहमीप्रमाणे घरातील सर्व स्वयंपाक देखील केला. अखेर एका गोंडस मुलीला त्यांनी जन्म देखील दिलेला आहे ती आणि आई दोघींची प्रकृती अत्यंत उत्तम आहे.

25 ऑक्टोबर 2022 रोजी सूर्यग्रहण होते तेव्हा पूजा या महिन्यांच्या गरोदर होत्या. अनेक वर्षातून एकदा सूर्यग्रहण येत असल्याने त्यांनी हे ग्रहण पाहण्याचा निश्चय केलेला होता त्यामुळे घराच्या टेरेसवर त्यांनी पतीसोबत आणि कुटुंबासोबत सूर्यग्रहण पाहिले त्यानंतर भाजी चिरणे , फळे कापणे यासारखे प्रकार देखील त्यांनी केले त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कुठलीही दुर्दैवी घटना झालेली नाही तसेच आई आणि बाळ यांची प्रकृती देखील उत्तम आहे.


शेअर करा