
नगर शहरात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून मावशीकडून पैसे घेऊन कुरकुरे आणण्यासाठी गेलेली एक सतरा वर्षीय मुलगी गायब झालेली आहे. एका अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याचा असल्याचा संशय असून शुक्रवारी 19 तारखेला याप्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलगी आणि तिची आई हे मावशीकडे काही दिवस राहण्यासाठी आलेले होते. मुलीला मावशीकडे ठेवून फिर्यादी कंपनीत गेलेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या बहिणीने त्यांना फोन करून तुमची मुलगी कुरकुरे आणायला गेलेली होती ती अजूनही परत आलेली नाही असे सांगितले. आईने तात्काळ घरी धाव घेतली मात्र ती मिळून आली नाही त्यानंतर याप्रकरणी पोलिसात फिर्याद नोंदवण्यात आलेली असून पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत.