
कोपरगाव येथील तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाळूसाठी हप्ता घेत असताना आमचे तहसीलदार हप्ते घेतात याची आम्हाला लाज वाटते. सरकारी वाळू डेपोतील प्रशासनातील या लोकांनी ठेकेदारांशी संगणमत केलेले आहे मात्र त्यांना सरळ केले जाईल , असा स्पष्ट इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला आहे.
पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की , ‘ राज्यात सर्वत्र वाळू डेपो अजून सुरू झालेले नाहीत त्यासाठी प्रशासन आणि ठेकेदार यांची युती कारणीभूत आहे. वाळूसाठी आम्ही पारदर्शक धोरण आणत आहोत मात्र आमचेच तहसीलदार हप्ते घेतात. अवैध वाळू उपशाला लगाम आणण्यासाठी महसूल विभागाने नवीन वाळू धरण अमलात आणलेले आहे .’
सर्वसामान्य नागरिकांना सहाशे रुपये ब्रास प्रमाणे वाळू मिळणार असून काही ठिकाणी वाळूचे उद्घाटन झाले मात्र डेपो सुरू होत नाहीत यासाठी वाळू ठेकेदार आणि प्रशासनातील काही जण अडथळे निर्माण करणे करत आहेत मात्र थोडा धीर धरा सगळेच सरळ होतील असाच गर्भित इशारा त्यांनी दिलेला आहे.