
कर्ज फेडण्यासाठी म्हणून पैशाची गरज निर्माण झाल्यानंतर चक्क मित्रालाच लुटण्याचा कट नगरमध्ये समोर आलेला आहे. मित्राच्या दुचाकीला पाठीमागून धक्का देऊन झालेले नुकसान भरून दे असा बहाना करत कोयत्याचा धाक दाखवत मित्राच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेऊन आरोपींनी पलायन केलेले होते. आगरकर मळा परिसरात 19 तारखेला ही घटना घडलेली होती.
उपलब्ध माहितीनुसार, सुरज सुनील नायकवाडी ( राहणार माळीवाडा ) हा त्याच्या मित्रासोबत 19 तारखेला रात्री केडगाव येथून आगरकर मळा येथे चाललेला होता त्यावेळी त्याच्या गाडीला पाठीमागून दोन जणांनी येऊन धडक दिली आणि त्यानंतर नायकवाडी याच्या गाडीचे नुकसान झाले. तुझ्या गाडीचे झालेले नुकसान भरून देतो असे म्हणत आरोपी सुरज यास बाजूला घेऊन गेले आणि तिथे गळ्याला कोयता लावून त्याच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या घेऊन फरार झालेले होते.
कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर तपास सुरू असताना हा गुन्हा सूरज याचाच मित्र आणि त्याच्या तीन अल्पवयीन जोडीदारांनी केलेला आहे अशी माहिती समोर आलेली आहे. तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी आमच्यावर कर्ज झालेले होते ते फेडण्यासाठी म्हणून त्याला लुटले असे सांगितलेले आहे.
आरोपींनी घेतलेल्या सोन्याच्या अंगठ्या अभिनव विजय सब्बन याच्याकडे दिलेल्या आहेत असे त्यांनी सांगितल्यानंतर या सराफाला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे सोबतच प्रकरणातील दोन आरोपी मंगेश कांबळे आणि बाबा कावळे ( दोघेही राहणार केडगाव ) हे मात्र अद्याप फरार असल्याची माहिती आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने विक्रमी वेळेत आरोपींना गजाआड केलेले आहे.