तुझ्यावर खर्च केलेले दहा हजार परत कर, ब्रेकअपनंतर पाठलाग करून मागितले पैसे

प्रेमप्रकरणात जोपर्यंत सर्वकाही गोड गोड असते तोपर्यंत वाद होत नाहीत मात्र एकदा वाद झाल्यानंतर अक्षरशः प्रेयसीवर केलेला खर्च देखील मागण्यापर्यंत काहीजणांची मजल जाते असाच एक प्रकार अमरावतीत समोर आलेला असून एका व्यक्तीने ‘ मी तुझ्यावर आतापर्यंत दहा हजार रुपये खर्च केलेला आहे ते पैसे मला परत दे नाहीतर माझ्याशी संबंध ठेव ‘ अशी धमकी एका तरुणीला देण्यात आलेली होती त्यानंतर तिच्या विद्यालयापर्यंत तिचा पाठलाग करण्यात आला . गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना घडली असून एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विकी बांडा बुचे ( राहणार अमरावती ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एक तरुणी दुचाकीने तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाकडे जात होती त्यावेळी विकी हा शेगावपासून तिचा पाठलाग करत होता त्यानंतर तो तिला आडवा आला आणि तिच्या दुचाकीची चावी काढून स्वतःच्या खिशात ठेवली. मी तुझ्यावर आतापर्यंत दहा हजार रुपये खर्च केलेले आहेत ते मला परत दे नाहीतर माझ्याशी संबंध ठेव नाहीतर मी तुला जिवे मारून टाकेल. लग्न कर नाहीतर मी माझ्या देखील जीवाचे बरे वाईट करून घेईल, असे देखील तुम्हाला त्यामुळे पीडित तरुणी ही घाबरून गेली.

पीडित तरुणीने स्वतःला सावरत जवळच्या एका नातेवाईकाला मोबाईलवर फोन केला आणि फोनवरती सांगत होती त्यावेळी तिने तिचा फोन स्पीकर फोनवर ठेवलेला होता त्यामुळे समोरच्या नातेवाईकाचा आवाज आरोपीला ऐकू आला म्हणून तो तिथून निघून गेला. कसेबसे करत पीडित तरुणी घरी पोहोचली आणि त्यानंतर तिने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.