मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांचा सूत्रधार कोण ? , अनिल देशमुख म्हणाले की..

शेअर करा

समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक आरोप केलेले आहेत. आपल्याला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले . उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक प्रकरणाचा मास्टरमाइंड परमवीर सिंग हेच आहेत असा घणाघती आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे सोबतच या पाठीमागे अदृश्यशक्ती आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ‘ काही राजकीय शक्तींनी दबाव आणून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना माझ्यावर शंभर कोटी रुपयांचा खोटा आरोप करायला लावला त्यातून माझी बदनामी करण्यात आली आणि न्यायालयात हे प्रकरण सिद्ध न झाल्याने न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत.

परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांची गेल्या पंचवीस वर्षापासून मैत्री असून माझ्या विरोधात ज्यांनी आरोप केले त्यांनी पुढे येऊन न्यायालयाला सांगणे गरजेचे होते. परमवीर सिंग यांना सात वेळा समन्स पाठवण्यात आले मात्र तरी देखील ते न्यायालयासमोर हजर झाले नाही . तब्बल सहा महिने ते फरार होते या सर्व घडामोडीमागे अदृश्य शक्ती असल्याने परमवीर सिंग यांच्या निलंबनाबद्दल राज्य सरकारने कॅटला अहवाल दिलेला नाही उलट त्यांचे निलंबन मागे घेऊन एक प्रकारे राज्य सरकारने त्यांना बक्षीसी दिलेली आहे. कायदेतज्ञांचे मत घेऊन आम्ही याच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे असे देखील ते पुढे म्हणाले.

अनिल देशमुख पुढे म्हणाले की ,’ परमवीर सिंग यांच्या विरोधात राज्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये किमान आठ ते दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी कायद्याचा दुरुपयोग यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असून मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्यात आली त्याचा सूत्रधार हा परमवीर सिंगच आहे त्यामुळे गृहमंत्री पदावर असताना मी त्यांची बदली खालच्या पदावर केलेली होती. एनआयएने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले आहे त्यामध्ये देखील परमवीर सिंग यांचा मुख्य रोल आहे असे नमूद केलेले आहे . अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणे सोबत मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा याचा जामीन अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने परमवीर सिंग यांचा या प्रकरणात मुख्य सहभाग असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना संरक्षण का देण्यात येत आहे ? असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा