शिरूर कासारमध्ये नर्सचे टोकाचे पाऊल , नवऱ्याचा फोटो..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बीड जिल्ह्यातील शिरूर कासार इथे समोर आलेली असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी स्टाफ म्हणून काम करणाऱ्या एका परिचारिकेने राहत्या घरी गळफास घेतलेला आहे . दुर्दैवाने ज्या ठिकाणी ती काम करत होती त्याच ठिकाणी तिचे शवविच्छेदन करण्यात आले त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांना देखील अश्रू अनावर झालेले होते.

उपलब्ध माहितीनुसार, शिवकन्या गोरख देवडे ( वय 33 राहणार पिंपळनेर हल्ली मुक्काम शिरूर ) असे या परिचारिकेचे नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हाट्सअप स्टेटसला पतीचा फोटो ठेवलेला होता त्यामध्ये इतरही तीन जण त्यात एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे . ते कोण आहेत याची माहिती सध्या पोलीस जमा करत आहेत

2010 पासून शिवकन्या शिरूरच्या आरोग्य केंद्रात कंत्राटी नर्स म्हणून नोकरीला होत्या. रविवारी रात्री त्यांनी राहत्या घरी पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. शेजारच्या व्यक्तींच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले . पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के यांनी घटनास्थळी जात लटकलेला मृतदेह खाली घेतला.

शिवकन्या यांचे पती गोरख देवडे हे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचे त्यामुळे ते घटना घडली त्यावेळेस घरी नव्हते तर शिवकन्या यांचा अकरा वर्षाचा मुलगा हा नातेवाईकांकडे गेला होता त्यामुळे त्या घरी एकट्या होत्या. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नसून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा