शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा आत्मदहनाचा इशारा

शेअर करा

नगर शहरातील रस्ते घोटाळा प्रकरणात बनावट टेस्ट रिपोर्ट अन थर्ड पार्टी रिपोर्ट याच्या आधारे महापालिकेने सुमारे 200 कोटी रुपयांचा सरकारी कामात भ्रष्टाचार केलेला असल्याचा आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलेला असून एक जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे.

नगर महापालिकेचा अनागोंदी कारभार काही लपून राहिलेला नाही. नगर महापालिकापेक्षा ग्रामपंचायत बरी अशी सध्या परिस्थिती असून महापालिकेचे एक एक कारनामे रोज उघडकीला येत आहेत. महापलिक आयुक्त डॉ. पंकज जावळे महापालिका अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरत असून त्यांचा अधिकाऱ्यांवर कुठलाही वचक राहिलेला नाही . नागरिकांमध्ये याविषयी नाराजीचे वातावरण असून काँग्रेसने शहरातील रस्ते घोटाळा प्रकरण बाहेर काढलेले होते.

महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे काँग्रेसने शहरातील रस्ते घोटाळा प्रकरणात बनावट टेस्ट रिपोर्ट थर्ड पार्टी रिपोर्ट याच्या आधारे 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप केलेला असून भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे . पंधरा दिवसांचा अल्टिमेटम यासाठी काँग्रेसने दिलेला होता मात्र अद्यापही महापालिकेकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एक जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे.

किरण काळे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त , जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक , नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील पत्र लिहिलेले आहे. काँग्रेसने शिष्टमंडळाशी चर्चा केलेली असून महापालिकेच्या या कारभारावर नागरिकांमध्ये देखील संतापाचे वातावरण असल्याकारणाने बहुतांश नागरिक काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेवर समाधान व्यक्त करत आहेत.


शेअर करा