‘ आम्ही राहुरीचे भाई ‘ म्हणत हॉटेलची केली तोडफोड

शेअर करा

नगर जिल्ह्यातील राहुरी येथे गेल्या काही महिन्यांपासून हॉटेल चालकांना दमदाटी करण्याचे प्रकार समोर येत असून पुन्हा एकदा अशीच एक घटना राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे समोर आलेले आहे. सह्याद्री परमिट रूम आणि बिअरबार येथे आठ ते नऊ जणांनी 20 मे रोजी जेवण केले त्यानंतर बिल न देता हॉटेलमध्ये धिंगाणा घालून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन पलायन केले जर पैसे मागितले तर जिवे मारण्याची देखील धमकी यावेळी हॉटेल चालक यांना देण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार , स्वप्निल चंद्रभान काळे ( वय 32 वर्ष ) यांचे चिंचोली फाटा येथे सह्याद्री परमिट रूम आणि बियर बार आहे. 20 मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आठ ते नऊजण हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी मनसोक्त दारू पिली आणि जेवणाची ऑर्डर दिली. एकूण बिल 9875 रुपये झालेले होते मात्र बिल मागितल्यानंतर हॉटेलचे चालक आणि कर्मचारी यांना त्यांनी शिवीगाळ केली त्यानंतर गल्ल्यांमध्ये हात घालून अडीच हजार रुपये रोख रक्कम काढली. आम्ही परिसरातील भाई आहोत. इथे इतर कुणालाही आम्ही हॉटेलचे आणि दारूचे जेवणाचे बिल देत नाही परत कधी तुझ्या हॉटेलला आलो तर जेवणाचे बिल मागायचे नाही नाहीतर तुला ठार करू. आम्ही कुणाला घाबरत नाही. तुम्हाला कोणाला सांगायचे त्यांना सांगा. आमच्या नादी लागले तर तुला जिवंत ठेवणार नाही , अशी देखील धमकी त्यांनी दिली आणि त्यानंतर हॉटेलमधील सामानाची तोडफोड करून आरोपी निघून गेले.

तक्रारदार व्यक्ती यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात दाखल होत आरोपी असिफ रहेमान सय्यद , प्रफुल्ल चंद्रभान ओहोळ , अनिल चंद्रभान ( राहणार गुहा तालुका राहुरी ) , सागर कांतीलाल उल्हारे ( राहणार राहुरी फॅक्टरी ) तसेच त्यांच्यासोबत असलेले सुमारे चार ते पाच इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा