सकाळपासून उपाशी आहे एक बासरी तरी कुणीतरी ?, व्हिडिओत अश्रू अनावर

शेअर करा

ऑनलाइन शॉपिंगच्या नादात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या व्यक्तींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जात असून एकेकाळी स्वदेशी खेळणी म्हणून ओळख असलेल्या वस्तूंना आता तितकेसे मार्केट राहिलेले नाही . अशा वस्तू विकणाऱ्या व्यक्तींचे हाल भयावह झालेले असून असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

लिव्ह फॉर फूड नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून एका बासरी विक्रेत्याची व्यथा शेअर करण्यात आलेली असून या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती हातात अनेक बासऱ्या घेऊन त्या विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या जवळील बासरी विकली गेली तर दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करता येईल या आशेने दिवसभर तो बासरी वाजवत विकत आहे मात्र भर उन्हात घामगाळून घसा कोरडा झाला अन जेमतेम साठ रुपये त्याला मिळाले आहेत . साठ रुपयात माझे पोट भरेल का ? असा सवाल तो विचारत आहे. एका तरुणाने त्याला काय झाले असे विचारले होते त्यावेळी त्याने डोळे भरून आणत आपल्या वेदना सांगितलेल्या आहेत.

व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने त्याला मदत केली मात्र त्याची व्यथा सांगताना त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचे देखील मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असून त्याने देखील मदत केली असल्याने व्हिडिओ बनवणारा व्यक्ती देखील कौतुकास पात्र ठरत आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक जणांनी बासरी विक्रेत्याच्या दुःखावर आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत सोबतच समाजातील कुठल्याही व्यक्तीवर अशी वेळ येत असल्याबद्दल रडू येत असल्याच्या देखील प्रतिक्रिया आहेत .

रस्त्याच्या कडेला अनेकदा लहान लहान गोष्टी विकणारे , फुल विक्रेते , पेन विक्रेते , अगरबत्ती विक्रेते असे व्यक्ती आपली दुकाने मांडून बसलेली असतात . मोठ्या मोठ्या मॉल मध्ये जाऊन दोन रुपयांची गोष्ट पाच रुपयांना घेणारे नागरिक अनेकदा अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करतात. वस्तूंची विक्री झाली तरच पोटाची खळगी भरेल अशा समाजातील या थराकडे दुर्लक्ष करू नये. आपणही त्यांच्याकडून खरेदी करावी अशी चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झालेली आहे.


शेअर करा