राज्याभिषेक पूरा हुआ , ‘अहंकारी राजा’ सड़कों पर कुचल रहा जनता की आवाज़

शेअर करा

नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गोदी मीडियाने चांगलीच कंबर कसलेली होती आणि त्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिमामंडन नेहमीप्रमाणे करण्यात आले. दिल्ली येथील जंतर-मंतरवर कुस्तीगीर महिला खेळाडूंनी भाजप खासदार ब्रीजभूषण सिंह यांच्या विरोधात केलेले आंदोलन देखील केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी मोडून काढलेले आहे . खेळाडूंनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केलेल्या असून भाजप नेते ब्रीजभूषण सिंह यांच्यावर चक्क लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत मात्र तरीही हे आंदोलन देखील मोडून काढण्यात आलेले आहे .

विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह कुस्तिगिरांचं जंतरमंतवर सुरू असलेला आंदोलन दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे हटवलं असून गेले 36 दिवस हे आंदोलन सुरू होतं.विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटू जंतरमंतरहून नव्या संसदेच्या दिशेने जाण्यासाठी जात असताना पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली.नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत आयोजित करण्याचा आंदोलक कुस्तीपटूंचा प्रयत्न होता मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला आहे .

“सर्व कुस्तीपटू तसंच ज्येष्ठ वयाच्या महिलांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी जंतरमंतर इथले आमचे तंबू काढून टाकायला सुरुवात केली आहे. तंबूमध्ये असलेल्या आमच्या वस्तूही घेतल्या जात आहेत. ही काय गुंडशाही आहे”? असं ट्वीट साक्षी मलिकने केलं आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देखील गाझीपूर इथे अडवण्यात आलेले असून टिकैत यांनी , ‘ पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना सीमेवर थांबवलं आहे. आम्ही सध्या इथेच निदर्शनला बसू आणि पुढची दिशा ठरवू. पैलवान मुलींना रस्त्यावर फरपटत नेणाऱ्या सरकारने मर्यांदाचा दाखला दिला आहे आणि खेळाडूंचा आम्हाला फार अभिमान वाटतोय. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गाझीपूर सीमेवरच असू.” असे म्हटले आहे तर राहुल गांधी यांनी ट्विट करून ‘ राज्याभिषेक पूरा हुआ – ‘अहंकारी राजा’ सड़कों पर कुचल रहा जनता की आवाज़ ‘ असे म्हटले आहे .

15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी रोजी हा संसदेचा उदघाटन सोहळा करण्यात आला नाही तर इंग्रजांना माफीनामे लिहिणारे सावरकर यांच्या जन्मदिवशी करण्यात आलेला आहे त्यावरून देखील भाजप सरकारच्या विरोधात देशात संताप पाहायला मिळत आहे . सर्वच विरोधी पक्षांनी देशाच्या इतिहासात राष्ट्रपतींचा अपमान होत असताना विरोधी पक्षांनी काय भूमिका घेतलेली होती ? याचा इतिहास लिहिला जाईल असे म्हटलेले आहे. ज्या पक्षांनी या उद्घाटनावर बहिष्कार टाकलेला आहे त्यामध्ये कांग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी, शिवसेना (उद्धव ) , आम आदमी पार्टी, डीएमके, जेडीयू, आरजेडी, आईयूएमएल, जेएमएम, एनसी, केसी (एम), आरएसपी, वीसीके, एमडीएमके, आरएलडी, सीपीएम, सीपीआई, एनसीपी और एसएस (यूबीटी) आहेत .


शेअर करा