गूढ उलगडलं…खताच्या गोणीत आढळला होता महिलेचा सांगाडा

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या मालेगाव परिसरातील विरळ रस्त्याजवळ समोर आलेले असून शेतात खताच्या गोणीमध्ये चक्क मानवी हाडे आढळून आलेली होती. अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलेला असून ही हाडे 25 वर्षांच्या मतिमंद मुलीची असल्याचे समोर आलेले आहे तर या प्रकरणात तिच्या साठ वर्षाच्या वडिलांना अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मुक्तारखान मोहम्मद खान ( वय ६० ) असे आरोपी वडिलांचे नाव खताच्या गोणीत मानवी सांगाडा आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मालेगाव परिसरात गायब असलेल्या महिलांची माहिती घेतली त्यावेळी त्यांना तीन महिला गायब असल्याची माहिती हाती लागली मात्र एका महिलेच्या बाबतीत कुणीही तक्रार केलेली नव्हती त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी मुक्तारखान याच्याकडे चौकशी सुरू केली त्यावेळी त्याने खुनाची कबुली दिलेली आहे.

आरोपीने पोलिसांना माहिती देताना आपली मुलगी ही 25 वर्षांची होती आणि ती मतिमंद होती. तिच्या वागण्यामुळे कुटुंबीयांना मोठा त्रास होत होता म्हणून रागाच्या भरात तिला मारहाण केली आणि त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरातच पुरून ठेवलेला होता मात्र घरात वास येऊ लागल्याने अखेर उरलेला मृतदेह उकरला आणि त्यानंतर खताच्या गोणीत भरून बाहेर निघून टाकलेला होता असे सांगितलेले आहे.

जिल्हा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तडसे , सारिका नारखेडे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी सळवेवार ,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास कोकाटे यांनी या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे .


शेअर करा