‘ नऊ वर्ष नऊ प्रश्न ‘, मोदीजी उत्तर द्या असं का केलं ?

शेअर करा

काँग्रेसने सध्या वेगवेगळ्या शहरात पत्रकार परिषदेचा धडाका लावलेला असून केंद्र सरकारला ‘ नऊ वर्ष नऊ प्रश्न ‘ विचारलेले आहेत. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्नांची ऍलर्जी असल्याकारणाने ते याची उत्तरे देणार नाहीतच उलट प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना देशद्रोही ठरवणे , खालच्या पातळीवर टीका करणे , प्रश्नाचा रोख दुसरीकडे वळवणे आणि प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींचे मानसिक खच्चीकरण करणे असे प्रयत्न तमाम गोदी मीडिया आणि भाजपकडून सध्या करण्यात येत आहेत.

काय आहेत काँग्रेसने विचारलेले प्रश्न ?

१) महागाई आणि बेरोजगारी का गगनाला भिडत आहे ? श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब गरीब का होत आहेत?

२) कृषी कायदा मागे घेताना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी का झाली नाही? किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी का दिली जात नाही ?

३) तुमचा परममित्र अदानी याला मदत करण्यासाठी जनतेचे कष्टाचे पैसे LIC आणि SBI मध्ये का गुंतवले जात आहेत ? काही लोकांना देश सोडून पळून जाण्याची परवानगी का दिली जात आहे?

४) महिला, दलित, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्यांक यांच्यावरील अत्याचारावर सरकार गप्प का आहे ?

५) 2020 मध्ये चीनला क्लीन चिट देऊनही तो भारतीय भूमीवर का बसला आहे?

६) निवडणुकीच्या राजकारणात पुढे जाण्यासाठी जाणूनबुजून द्वेषाचे राजकारण का केले जात आहे?

७) गेल्या नऊ वर्षांत तुम्ही घटनात्मक मूल्ये आणि प्रजासत्ताक संघटना कमकुवत करण्याचे काम का केले? विरोधी पक्षांची विरोधी वृत्ती का?

८) गरीब, गरजू आणि आदिवासींसाठी असलेल्या योजनांचे बजेट कमी करून कमकुवत का केले जात आहे?

९) कोविड-19 मुळे 40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही सरकार त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई का देत नाही ? अचानक लॉकडाऊन का लागू करण्यात आला?


शेअर करा