फक्त ‘ इतक्या ‘ रुपयांसाठी लिपिक अडकला , कार्यालयाबाहेर बोलावलं अन..

शेअर करा

सरकारी पातळीवर भ्रष्टाचार रोखण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी सरकारी बाबू त्यांची वरकमाई सोडण्यास तयार नसण्याचे दिसत असून असाच एक प्रकार लातूर येथे समोर आलेला आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत एक लाख रुपये कर्ज योजनेचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना लातूर येथील कार्यालयातील एका लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे . गांधी चौक पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत एक लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जदार व्यक्तीने प्रस्ताव सादर केलेला होता. तो प्रस्ताव मंजूर करून मुख्य कार्यालयास पाठवण्यासाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील लिपिक म्हणून काम करणारा तातेराव काशिनाथ जाधव याने पंचांसमक्ष पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती यावेळी तक्रारदार यांनी पहिल्या टप्प्यात पाचशे रुपये दिले आणि उरलेले काम झाल्यानंतर देण्याचे मान्य केलेले होते.

दरम्यानच्या काळात तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि त्यानुसार सापळा रचण्यात आला. पाचशे रुपये घेऊन हा व्यक्ती तातेराव कडे गेला. दोघे कार्यालयाच्या बाहेर भेटले त्यानंतर पाचशे रुपयांची लाच घेताना या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा