संतापजनक..अल्पवयीन विद्यार्थिनींकडे शिक्षकाची निर्लज्ज मागणी : पहा व्हिडीओ

शेअर करा

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेल्या उत्तर प्रदेशात एक संतापजनक अशी घटना समोर आलेली असून जोऊनपूर इथे एका शिक्षकाने ‘ तुला पास करतो मात्र तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव ‘ अशी मागणी केलेली आहे. त्याची ही धक्कादायक मागणी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल व्हायरल झालेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा शिक्षक डॉक्टरेट पास केलेला असून विद्यापीठ प्रशासनाला देखील यामुळे धक्का बसलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार,प्रदीप कुमार सिंग असे आरोपी शिक्षकाचे नाव असून व्हिडिओमध्ये तो एका अल्पवयीन मुलीला अतिशय निर्लज्जपणे अश्लील भाषेत बोलताना दिसत आहे. विद्यार्थिनीवर तो चुंबन आणि शारीरिक संबंधासाठी दबाव टाकताना दिसत असून विद्यार्थिनीने मोठा धाडसाने त्याच्या या मागणीचा व्हिडिओ बनवला आणि अखेर त्याचा पर्दाफाश केला. कॉलेज प्रशासनाने कारवाई करत त्याच्या चौकशीला सुरुवात केलेली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट पसरली असून विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना घेराव घालत तात्काळ त्यांना निलंबित करण्याची मागणी केलेली आहे. विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याने त्यामुळे कॉलेज प्रशासनाने अखेर पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांना कसेबसे आश्वासन देऊन शांत केलेले आहे मात्र जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन केले जाईल असे विद्यार्थ्यांनी ठणकावले आहे.

प्राचार्य अलोक कुमार सिंह यांनी माध्यमांशी बोलताना , प्रदीप कुमार सिंह हे इतिहास विषयाचे शिक्षक असून व्हिडिओची दखल घेत कॉलेजच्या ईमेल आयडीवरून त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे . त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना सांगण्यात आलेले असून हा व्हिडिओ अत्यंत लाजिरवाणा आहे . वस्तुस्थितीच्या आधारे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल , ‘ असे म्हटले आहे .


शेअर करा